मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):-शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटाला ठणकावले आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विश्व हिंदु परिषदेचे नेते उद्धव कदम यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट व भाजपा यांच्यावर जोरदार टीका केली.
शिवसेनेने दसरा मेळावा हा शिवतीर्थावर आयोजनाबाबत मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज सादर केलेला असुन अजून शिवसेनेला परवानगी मिळालेली नाही.याच पाश्वभूमीवर शिंदे गट ही दसरा मेळावा घेण्याबाबत प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे.मात्र दसरा मेळावा हा शिवसेनेचाच होणार असल्याचा उद्धव ठाकरे यांनी पुनरुच्चार केला आहे.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दसरा मेळाव्याकरिता शिवसैनिकांनी येण्याची तयारी सुरु केली आहे.तर परवानगीचा भाग हा महापालिकेचा काय असेल तो असेल मात्र शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला ठणकावले आहे.