उध्दव ठाकरे यांच्यापेक्षा तीनपट पेक्षा जास्त निधी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला
अब्दुल सत्तार यांच्याकडून सरकारचे कौतुक
औरंगाबाद-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
काल औरंगाबादमधील सिल्लोडमध्ये शिंदे गटाकडून जाहीर सभा घेण्यात आली.या सभेला खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते शिवाय संदिपान भुमरे,अब्दुल सत्तार उपस्थित होते.जुलै,ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीची मदत सप्टेंबरमध्ये मिळाली यावेळी श्रीकांत शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली नुकत्याच झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल कॅबिनेटमध्ये यासंदर्भातील निर्णय होईल असे ते यावेळी म्हणाले.
एकनाथ शिंदे हे शेतकऱ्यांचे भूमिपुत्र आहेत शेतकऱ्यांचे कैवारी आहेत.काही लोक फक्त फोटो काढण्यासाठी आपल्या तालुक्यात येतात. आदित्य ठाकरे हे अंधारात आले काय पाहिले असेल माहीत नाही सत्तेत असताना शेतकऱ्यांची आठवण झाली नाही सत्ता गेल्यापासून बाहेर पडू लागलेत असा टोला अब्दुल सत्तार यांनी यावेळी लगावला.उध्दव ठाकरे यांच्यापेक्षा तीनपट पेक्षा जास्त निधी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. सत्ता गेल्यानंतर यांना बांधावर जाण्याची आठवण येऊ लागली.सर्व गोष्टी पाहिल्या तर शेतकऱ्यांना मदत करणारे हे राज्य सरकार आहे.या सरकारने सर्व शेतकरी,शेतमजूर यांची दिवाळी साजरी व्हावी यासाठी प्रयत्न केले असे म्हणत त्यांनी सरकारचे कौतुकदेखील केले आहे.