नांदेड-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा सोमवारी रात्री नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये दाखल झाली. देगलूरमधून आज सकाळी सहा वाजता पदयात्रेला पुन्हा सुरुवात झाली होती मात्र अटकळ येथे यात्रा पोहोचताच मोठा अनर्थ घडला आहे. अटकळी जिल्हा नांदेड येथे काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस श्री. कृष्णकुमार पांडे नागपूर यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे.महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेचा आज दुसरा दिवस आहे.यात्रा चार दिवस नांदेड जिल्ह्यात आहे.माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण,आमदार अमर राजूरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यात्रेचे नियोजन केले आहे मात्र यात्रेचा आजचा दुसराच दिवस असताना मोठी घटना घडली आहे.
कृष्ण कुमार पांडे यांनी भारत जोडो यात्रेच्या झेंडा तुकडीचे संचालन केले त्या दरम्यान त्यांना श्वास घेण्याचा त्रास होत होता त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून दवाखान्यात दाखल केले मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचे दुःखद निधन झाले आहे.दुपारच्या कॅम्पमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश,दिग्विजय सिंह,सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजी देसाई,एच के पाटील,नाना पटोले,अशोक चव्हाण,बाळासाहेब थोरात,संदेश सिंगलकर,महेंद्र सिंह वोहरा यांनी श्रद्धांजली वाहली आहे.कृष्णकुमार पांडे यांच्यावर शवविच्छेदन झाल्यानंतर राहुल गांधी यांच्या शिबिरस्थळी पार्थिव नेण्यात येणार आहे नंतर नागपूरला आणण्यात येईलसध्या रुग्णालयात प्रमुख नेते उपस्थित आहेत.दरम्यान कृष्ण कुमार पांडे हे गेल्या पाच दशकापासून काँग्रेस व सेवादलमध्ये सक्रीय होते.आंध्र प्रदेश,कर्नाटकसह विविध राज्याचे ते प्रभारी होते आता त्यांच्याकडे मध्यप्रदेशची जबाबदारी होती.दीड वर्षापूर्वी त्यांचे पुत्र धीरज यांचे करोनाने निधन झाले धीरज पांडे हे युवक काँग्रेसचे सचिव होते.