Just another WordPress site

चंद्रग्रहण महाराष्ट्रात मुंबई पुणेसह कुठे किती वाजता दिसेल ?

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 

आज मंगळवार ८ नोव्हेंबर २०२२ ला दिसणारे खंडग्रास चंद्रग्रहण आशिया,ऑस्ट्रेलिया,उत्तर-दक्षिण अमेरिका येथील काही भागातून दिसेल. पूर्वेत्तर भारताचे टोक असलेल्या अरुणाचल प्रदेशात चंद्र उगविताना खग्रास स्थिती असेल परंतु चंद्र क्षितिजावर असल्याने पाहता येणार नाही. उर्वरित देशात सर्वत्र हे ग्रहण खंडग्रास दिसेल.भारताबाहेर ८ तारखेला भारतीय वेळेनुसार पारी १.३२ वाजता छायाकल्प चंद्रग्रहणाला सुरुवात होईल.२.३९ वाजता खंडग्रास ग्रहणाला सुरुवात होईल.३.४६ वाजता खग्रास ग्रहणाला सुरुवात होईल तर ५.११ मिनिटाने खग्रास ग्रहण समाप्त होईल.६.१९ वाजता खंडग्रास ग्रहण समाप्त तर ७.२६ वाजता छायाकल्प चंद्रग्रहण समाप्त होईल.

ग्रहणाचा छायाकल्प काळ २.१४ तास खंडग्रास काळ २.१५ तास खग्रास काळ १.२५ तास तर एकूण ग्रहणाचा काळ ५.५४ तास असेल. भारतातून चंद्रोदया सोबतच ग्रहण लागलेले असेल आणि ७.२६ वाजता ग्रहण संपेल.पूर्व भारतात मोठे ग्रहण दिसेल तर पूर्व – पश्चिम रेखांशा नुसार ग्रहण (ग्रस्तोदित भाग ) लहान होत जाईल.सूर्य आणि चंद्र ह्यांचे मध्ये पृथ्वी सरळ रेषेत आली असता चंद्रग्रहण होत असते ह्यात पृथ्वीची सावली चंद्रावर पडते त्यानुसार गडद छायेत पूर्ण चंद्र आल्यास खग्रास,काही भाग आल्यास खंडग्रास तर उप छायेत चंद्र आल्यास छांयाकल्प चंद्रग्रहण होते त्याप्रमाणे दरवर्षी दोन तरी चंद्रग्रहणे होत असतात.

महाराष्ट्रातील शहरे आणि चंद्रग्रहण वेळ

मुंबई ६.०१ ते ६.१८
औरंगाबाद ५.४९ ते ६.१८
ठाणे ६.०१ ते ६.१८

पुणे ५.५८ ते ६.१८
नाशिक ५.५६ ते ६.१८
नागपूर ५.३२ ते ६.१८
जळगाव ५.४७ ते ६.१८

२०२३ मध्ये एकूण चार ग्रहणे होणार आहेत. त्यात २०/४/२०२३ रोजी खग्रास सूर्यग्रहण, ५/६ मे २०२३ रोजी छायाकल्प चंद्रग्रहण, १४/१०/२३ रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण आणि शेवटी २८, २९ ऑक्टोबर २०२३ रोजी खंडग्रास चंद्रग्रहनांचा समावेश आहे. पृथ्वीवरची दररोजची रात्र हा सुद्धा एक सावलीचाच प्रकार असून अशी ग्रहणे सूर्यमालेत सतत होत असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.