Just another WordPress site

सगळ्या प्रवृत्ती बाजूला टाकून महाराष्ट्राची सुसंस्कृत परंपरा जतन करुया-सुप्रिया सुळे यांचे आवाहन

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 

‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाचे नेते आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी गलिच्छ भाषा वापरल्याबद्दल खुद्द राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.सुप्रिया सुळेंनी एकामागून एक चार ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.जर कुणी चुकीचे बोलले असेल, त्यांनी महिलांचा सन्मान जपला नसेल म्हणून आपण अस्वस्थ होणे स्वाभाविक असले तरी आपण या सगळ्या प्रवृत्ती बाजूला टाकूयात आणि महाराष्ट्राची जी सुसंस्कृत परंपरा आहे ती जतन करुया असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

आपल्या प्रतिक्रियेत सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की,महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली कारण अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असे बोलणे-वागणे ही आपली परंपरा नाही अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात परंतु सगळेच तारतम्य पाळतात असे नाही.जरी त्यांनी काही तारतम्य पाळले नाही तरी ज्या पद्धतीने विविध संस्था,व्यक्ती, माध्यमातून याबाबत प्रतिक्रिया आल्या,संवेदना व्यक्त केल्या गेल्या ही बाब आश्वासक आहे तिची नोंद घेणे गरजेचे आहे.मला आवर्जून असे सांगायचे आहे की,जर कुणी चुकीचे बोलले असेल त्यांनी महिलांचा सन्मान जपला नसेल म्हणून आपण अस्वस्थ होणे स्वाभाविक असले तरी आपण या सगळ्या प्रवृत्ती बाजूला टाकूयात आणि महाराष्ट्राची जी सुसंस्कृत परंपरा आहे ती जतन करुया.याप्रसंगी राज्यातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी,जाणकारांनी समंजसपणाची भूमिका दाखवून महाराष्ट्र हा ‘सुसंस्कृतच महाराष्ट्र’ आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केले याबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते.
धन्यवाद.
जय हिंद-जय महाराष्ट्र !

Leave A Reply

Your email address will not be published.