पालकमंत्री व विद्यमान अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांच्यासह २२ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल
जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीत ३१६ अर्जाची विक्री
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी दि.७ रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील,विद्यमान अध्यक्षा मंदाकिनी खडसे,माजी मंत्री डॉ.सतीश पाटील यांच्यासह २२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले तर १५२ अर्जांची विक्री झाली.जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक आहेत.उमेदवारी अर्ज घेण्याचा व दाखल करण्याचा सोमवारी तिसरा दिवस होता यापूर्वी पहिल्या दिवशी ७९ दुसऱ्या दिवशी ८५ तर सामेवारी तब्बल १५२ अर्जांची विक्री झाली आहे.आजपर्यंत तब्बल ३१६ अर्जांची विक्री झाली आहे.१० नोव्हेंबर अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे.
जिल्हा दूध संघासाठी आजपर्यंत संजय पवार व सोनल पवार यांचेच अर्ज दाखल झाले होते मात्र सोमवारी तब्बल २२ अर्ज दाखल झाले.अर्ज दाखल करणारे उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत.मंदाकिनी खडसे (मुक्ताईनगर तालुका),गुलाबराव पाटील (जळगाव तालुका),डॉ.सतीश पाटील (पारोळा तालुका),विजय रामदास पाटील (वि.जा.भ.ज.वि.मा.प्र.),विजय पाटील (पाचोरा तालुका),पूनम प्रशांत पाटील (महिला राखीव),पूनम प्रशांत पाटील (भडगाव तालुका),हेमराज चौधरी(यावल तालुका),मधुकर राणे(बोदवड तालुका),स्मिता वाघ (अमळनेर तालुका),भैरवी पलांडे (महिला राखीव),मनीषा पाटील (महिला राखीव),ओंकार मुंदडा (धरणगाव तालुका),रमेश पाटील (जळगाव तालुका) या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.