अमरावती येथे परशुराम अन्नदान सेवा समितीच्या वतीने भोजन रथाचे लोकार्पण
परशुराम अन्नदान सेवा समितीचा स्तुत्य उपक्रम
अमरावती-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-येथील परशुराम अन्नदान सेवा समितीच्या वतीने दि.१ सप्टेंबर २२ रोजी समितीच्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण होत असल्याने त्यानिमित्ताने समाजबांधव व समिती पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत भोजन रथाचे लोकार्पण करण्यात आले.या स्तुत्य उपक्रमाचे परिसरात कौतुक केले जात आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंदजी गंगले यांनी केले.
या कार्यक्रमाला हेमंतकुमार पटेरीया.दिपेंद्रजी मिश्रा,अरविंदजी गंगले,दिपकजी शर्मा,नितेशजी पांडे,राजेशजी चौबे,गिरीशजी शर्मा,जितेंद्र शर्मा,गणेश शर्मा,अमित शर्मा,धर्मेंद्र शर्मा,मोहीतजी दिक्षित,विजय जोशी,राहुलजी गुल्हाने,मनीष केडिया,भावेश परमार,हर्षद केडिया,विकास मोरवाल,आकाश मोरवाल,संजय नरबान,अंकित श्रीवास,कमल नरबान,चंदन नरबान,हिमांशू केडिया यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.