अब्दुल सत्तार यांनी ज्या सुप्रिया सुळे यांच्याविषयी अपशब्द वापरले त्या सुळे यांचे वडील आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कामाविषयीचा उल्लेख करत सामना दैनिकातून अब्दुल सत्तार यांच्याविरोधात हल्लाबोल करण्यात आला आहे.’सवित्रीबाई फुले,अहिल्याबाई होळकर,राजमाता जिजाऊ अशा महान स्त्रीयांचा वारसा सांगणारे हे महाराष्ट्र राज्य आहे.महिलांना सन्मान व हक्क मिळावेत यासाठी मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांनी केलेले योगदान विसरता येणार नाही.त्यांची कन्या व भारतीय संसदेची सदस्या सुप्रिया यांच्याविषयी बेशरमपणाचे वक्तव्य करताना अब्दुल्लांची जीभ झडली कशी नाही?’असा सवाल ‘सामना’तून उपस्थित करण्यात आला आहे.दरम्यान महानाट्यवाल्यांचे सरकार सर्वत्र ‘तिसरा’ अंक करत धिंगाणा घालीत सुटले आहे या धिंगाण्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या कमरेचे सुटले पण देवेंद्र फडणवीस यांचा अगतिक धृतराष्ट्र का झाला आहे? असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही घेरण्याचा प्रयत्न केला आहे.