जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक नऊ समोरील जिन्यात महिलेला अडवून एकाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे.याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिल्यावरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,जळगाव तालुक्यातील एका गावातील २२ वर्षीय पीडिता जिल्हा रुग्णालयात आली असता सदरील महिलेस विजय ऊर्फ बबल्या दिलीप पाटील (रा. कुसुंबा, तुळजाईनगर) व त्याच्यासोबत इतर दोघांनी वॉर्ड क्रमांक नऊजवळील जिन्याजवळून पीडिता जात असताना तिचा रस्ता अडविला त्यावेळी विजय ऊर्फ बबल्याने,‘तू माझ्याशी संबंध ठेव,नाही तर मी तुला उचलून नेईल’,असे सांगून विवाहितेचा हात धरून विनयभंग केला.याबाबत पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस नाईक अलका शिंदे करीत आहेत.