औरंगाबाद-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
शिवसेना नेते संजय राऊत यांना १०० दिवसांनंतर जामीन मंजूर झाला आहे यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी हे आमच्यासाठी आनंदाची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया दिली तसेच मी न्यायपालिकेला धन्यवाद देईल हा त्यांच्या लेखनीचा विजय असल्याचेही खैरे म्हणाले.शिवसेनेचा एकनिष्ठ नेता कितीही दबाव आला तरी दबला नाही ते बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक असल्याचे संजय राऊत यांनी दाखवून दिले आहे असे चंद्रकांत खैरे म्हणाले.या ४० गद्दारांनी यातून उदाहरण घ्यावे ज्यांनी दबाव टाकला ते आता उघडे पडले असल्याची टीका देखील चंद्रकांत खैरे यांनी केली तसेच हा सत्याचा विजय असून राऊतांना मिळालेला हा एकनिष्ठेचा जामिन असल्याचे खैरे म्हणाले.किरीट सोमय्या माणूस काही तरी बोलतो मी त्याला लोकसभेत शक्ती कपूर असल्याचे मी आधीच म्हटले आहे. तुम्हाला लोकांची कामे करता येत नाही का?असा सवालही चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे आम्ही जाईल तिकडे मोठी गर्दी होती असे चंद्रकांत खैरे म्हणाले.
दिपाली सय्यद यांना कोणी भाव न दिल्याने त्या तिकडे निघाल्या आहेत.बळजबरीने त्या तिकडे निघाल्या आहेत.आज त्या जे आरोप नीलमताई गोऱ्हे,सुषमा अंधारे यांच्यावर आरोप करतात.नीलमताई या ज्येष्ठ नेत्या आहेत.सुषमा अंधारे यांचे वक्तृत्त्व चांगले आहे.आमच्या मनिषा कायंदे या प्राध्यापक होत्या त्याचबरोबर त्या डॉक्टर आहेत.आमच्या पक्षात दिपाली सय्यद यांना कसेलही पद दिले नव्हते असे चंद्रकांत खैरे म्हणाले.युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी शिवसेनेचा ढाण्या वाघ आमची मुलुख मैदानी तोफ संजय राऊत यांना जामीन मिळाला आहे त्यामुळे शिवसैनिक नाही तर राज्यातील जनतेला आनंद आहे.संजय राऊत १०० दिवस तुरुंगात राहिले पण शरण गेले नाहीत त्यामुळे आम्हाला आनंद आहे असे वरुण सरदेसाई म्हणाले.हा जामीन यापूर्वी झाला असता पण वेळ काढण्यात येत होता असे सरदेसाई म्हणाले.