Just another WordPress site

‘आपली सुटका झाल्याचा आनंद आहे’-जेलमधून सुटका झाल्यानंतर राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 

शिवसेना खासदार संजय राऊत याना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी जामीन मंजूर झाला आहे यांनतर काल ७ वाजता ऑर्थर रोड जेलमधून राऊत यांची सुटका कऱण्यात आली.राऊत यांच्या स्वागताला शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती.’आपली सुटका झाल्याचा आनंद आहे’ अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.संजय राऊत म्हणाले  की,सुटका झाल्याचा आनंद आहे.माझी अटक कोर्टानेच बेकायदेशीर ठरवली आहे. न्यायालया वरील विश्वास वाढला.आम्ही जे निरीक्षण सांगत होतो तेच कोर्टाने सांगितले.माझी तब्ब्येत आत्ता ठीक नाही पण मला बर वाटल्यानंतर नक्की याविषयी माध्यमांशी सविस्तर बोलेन असे संजय राऊत यांनी म्हटले.आम्ही लढणारे आहोत असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला आहे.

मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे.शिवसेनेवर या ३ महिन्यात खूप प्रहार झाले पण शिवसेना खचली नाही.आमचा आत्मा बाळासाहेब ठाकरे आहेत त्यांच्या स्मृतिस्थळावर जाणार आहे असे राऊतांनी सांगितले.उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून बोलणे झाले.त्यांना अतिशय आनंद झाला असेही संजय राऊत म्हणाले.दरम्यान तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊतांनी गळ्यातील भगवे उपरणे फडकावून आणि हात जोडून अभिवादन केले.आर्थर रोड तुरुंग परिसरात संजय राऊत यांच्या समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.संजय राऊत हे शिवसेनेचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जातात त्यामुळे त्यांच्या सुटकेमुळे शिवसैनिकांच्या अंगात नवा जोश आणि ऊर्जा संचारल्याचे पाहायला मिळत आहे.राऊत जेलबाहेर आल्यामुळे उद्धव ठाकरेंनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.