मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):-मी आता कोणत्याही प्रकारची सत्तेची जबाबदारी घेणार नाही कारण माझे वय आता ८२ झाले आहे.या वयात मी आता कोणत्याही प्रकारची सत्तेची जबाबदारी स्वीकारणार नाही.यात अपवाद हा मोरारजी देसाईंचा आहे तसेच त्यांचे ते भाग्य आहे कि मोरारजी देसाई हे ८२ व्य वर्षी पंतप्रधान झाले.मात्र मी मोरारजींचा कित्ता गिरवू इच्छित नाही असे सांगत त्यांच्या नावाबाबत पंतप्रधान शर्यतीच्या ज्या वावड्या उठविल्या जात आहेत त्याला पूर्णविराम त्यांनी दिला आहे.शरद पवार यांनी ठाण्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत असतांना वरील मत विशद केले.
राज्यात सध्या राजकीय घडामोडी वेगाने घडत असून याचाच एक भाग म्हणजे नुकतेच एकनाथ शिंदे यांच्यासहशिवसेनेचा मोठा गट फुटून बाहेर पडला आहे व याचेच द्योतक म्हणजे सत्ता बदल यातून घडून आला आहे.त्यामुळे महाविकास आघाडी एकत्र राहणार कि विभक्त राहणार याबाबत तर्क वितर्क लावले जात आहे.यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी समविचारी पक्षांनी एकत्र राहण्याबाबतची भूमिका असल्याचे स्पष्ट सांगितले आहे.त्यात उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेड सोबत युतीची घोषणा केल्यापासून पुन्हा महविकास आघाडी फुटण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.तर दुसरीकडे शरद पवारांनी पंतप्रधान व्हावे हि मनीषा बाळगणारा गट अस्तित्वात आहे.मात्र मी आता कोणत्याही प्रकारची सत्तेची जबाबदारी घेणार नाही हे सांगून आपण पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नसल्याचे दाखवून दिले आहे.