Just another WordPress site

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित घेणे शक्य?

मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांची पत्रकारपरिषदेत माहिती

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 

देशात २०२४ मध्ये होणाऱ्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी आहे असे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी नुकतेच पुण्यात स्पष्ट केले.मात्र अशा प्रकारचा निर्णय घेणे केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याने त्यांनी पुढाकार घेतल्यास पुढील प्रक्रिया केली जाईल असेही त्यांनी नमूद केले.मतदार यादी पुर्नरीक्षण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राजीवकुमार पुण्यात आले होते.विविध कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला.‘आगामी लोकसभा,विधानसभा निवडणुका एकत्रित शक्य आहे का,’असे विचारले असता राजीवकुमार म्हणाले,‘या दोन्ही निवडणुका एकत्रित घेणे आयोगाला शक्य आहे. त्यासाठी आमची पूर्ण तयारीही आहे मात्र हा निर्णय घेणे सर्वस्वी केंद्र सरकारच्या हाती आहे.’

तृतीयपंथीयांकडे स्वतःची ओळख पटवून देणारी कोणतेही कागदपत्रे किंवा ओळखपत्र नाही.त्याची निवडणूक आयोगाने गांभीर्याने दखल घेतली आहे त्यामुळे तृतीयपंथीयांना ओळखपत्रे कशा पद्धतीने देता येतील याबाबत राज्याचे निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.जन्माचा दाखला,प्रतिज्ञापत्र तसेच मालमत्तेसंदर्भातील कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी ही समिती काम करणार आहे असेही यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.