यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील मुदत संपत असलेल्या आठ ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचासह सदस्य पदाच्या पंचवार्षिक सार्वत्रीक निवडणुक डिसेंबर २२ मध्ये होत असून त्यासाठी निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आला आहे परिणामी ग्रामपंचायत निवडणूक हालचालींना वेग येणार असून गावपातळीवरील पुढारी व गावकरी यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
सर्वाच्च न्यायलयाच्या विशेष अनुमती २०२१च्या संलग्न याचिकांमध्ये दिनांक ४/५/२२ च्या अंतरिम आदेशामध्ये १०/३/२२ रोजीच्या टप्प्यापासुन पुढील प्रक्रीया पुर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार आयोगाच्या दिनांक ६/५/२२ दिनांक ३०/५/२२ दिनांक ३/६/२२ प्रभाग रचना पुर्ण करण्यात आली असुन यावल तालुक्यातील आठ ग्रामपंचायती अंतर्गत होवु घातलेल्या पंचवार्षीक सार्वत्रीक निवडणुकीसाठी या गावांचा समावेश आहे.यावल तालुक्यातील दिनांक १८/११/२२ शुक्रवार पासुन या संपुर्ण निवडणुकीच्या प्रक्रीयेस सुरुवात होणार असुन दिनांक १८/१२/२२ रविवार रोजी या निवडणुकी साठी मतदान होणार आहे.या निवडणुकीत सर्व राजकीय पक्षाच्या दृष्टीने सर्वांचे लक्ष वेधणारी न्हावी प्रगणे यावल या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीसह तालुक्यातील चुंचाळे,पिळोदे बुद्रुक,पाडळसे,चिखली खुर्द,चिखली बुद्रुक,कासारखेडे,चितोडा या गावांच्या ग्रामपंचायतीचा या निवडणुकीत समावेश आहे.दरम्यान निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्याने गावपातळीवर राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे.