यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील शिवसेनाच्या वतीने शिवसेना (ठाकरे गट ) मुलुक मैदान तोफ प्रवक्ते खासदार संजय राऊत यांची जामिनावर मुक्तता केल्यामुळे शहरभरामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला.संजय राऊत यांना भाजप सरकारच्या इशाऱ्यावर न्यायालयाने ईडीकडून केलेली अटक ही न्यायलयाने बेकायद्याशीर दाखवुन त्यांचा जामीन मंजुर करून सत्ताधाऱ्यांना त्याची जागा दाखवून दिली असल्याची भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
यानिमित्त आयोजित आनंदोत्सव कार्यक्रम शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख गोपाळ चौधरी,तालुका प्रमुख रविन्द्र सोनवणे व शहरप्रमुख जगदीश कवडीवाले माजी नगराध्यक्ष दिपक बेहडे यांच्या नेतृत्वाखाली यावल चोपडा मार्गावरील भुसावळ टी पॉईटवर शिवसैनिकांच्या वतीने भाजपा सरकारच्या विरूध्द घोषणा देत फटाकेच्या आतिषबाजीच्या जल्लोषात आनंद साजरा करण्यात आला.यावेळी तालुका शिवसेनेचे उपप्रमुख शरद कोळी,शहर उपप्रमुख संतोष धोबी,माजी तालुकाप्रमुख कडु पाटील,पप्पु जोशी,संतोष वाघ,आदीवासी सेनेचे तालुका प्रमुख हुसेन तडवी, योगेश चौधरी,अजहर खाटिक,शकील पटेल यांच्यासह मोठया संख्येत शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.