Just another WordPress site

ताकद है तो लढो..,गेली ४० वर्ष लढलो …जिंकत आलोय…जनता माझ्या पाठीशी-एकनाथ खडसेंचे आवाहन

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून या जिल्हा दूध संघावर ताबा मिळवण्यासाठी गिरीश महाजन व दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.मुक्ताईनगर मतदारसंघात भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी खडसेंच्या पत्नी मंदा खडसे यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करुन आव्हान दिल्यानंतर या आव्हानाला एकनाथ खडसेंनी जोरदार उत्तर दिले आहे. खोक्यांच्या मदतीने तुम्ही राज्याचे सरकार बदलू शकता मात्र या जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत तुम्ही खोके वापरा की पेट्या वापरा,मतदार आमच्या बाजूने आहे सर्व सभासदांशी माझे बोलणे झाले आहे आणि ते माझ्या बाजूने आहेत त्यामुळे कोणी काही केले तरी जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत विजय आमचाच होईल असा आवाहन वजा इशारा एकनाथ खडसे यांनी नाव न घेता मंत्री गिरीश महाजन व शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील व त्यांच्या समर्थक आमदारांना दिला आहे.जिल्हा दूध संघाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तसेच जिल्हा दूध संघ प्रकरणी पोलिसात दाखल गुन्ह्याच्या चौकशीबाबत माहिती देण्यासाठी एकनाथ खडसे यांनी गुरुवारी त्यांच्या जळगावातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी शिंदे गट व भाजप युतीवर सरकारवर गंभीर आरोप करत पोलिसांच्या कारभारावर ताशेरे ओढले आहे.

जिल्हा दूध संघातील चोरी-अपहाराचे प्रकरणी दाखल करण्यात आहे त्याबाबींची चौकशी न करता पोलीस संपूर्ण दूध संघाची चौकशी करत आहेत आणि हा पोलिसांचा कारभार म्हणजे चोर सोडून संन्यासाला फाशी असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे.पोलिसांकडून चौकशी दरम्यान दूध संघातील निखिल सुरेश नेहते या कर्मचाऱ्याला संचालक मंडळाच्या विरोधात पाहिजे तसा जबाब देण्यासाठी धमकी दिली जात असून तसा जबाब दिला नाही तर पंधरा वर्षे जेलमध्ये जावे लागेल अशी धमकी पोलिसांकडून दिली जात आहे.निखील नेहते या कर्मचाऱ्याने आधी दिलेल्या जबाबात संचालक मंडळ दोषी आहे असे कुठे दिसत नव्हते मात्र आता चेअरमन आणि व्यवस्थापन मंडळाने सांगितले असा जबाब देण्यासाठी पोलीस निखिल नेहते यास धमकी देत असून त्याच्या वडीलांना त्रास देत आहे असा धक्कादायक आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे यावेळी हीच माहिती कर्मचारी निखील नेहते यानेही पत्रकार परिषदेत सांगितली त्यावरुन चौकशी अधिकारी बदलण्यात यावा व निःपक्ष अधिकारी नियुक्त करावा अशी मागणी न्यायालयात करणार असल्याचेही खडसेंनी सांगितले.

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत,आहे त्या तालुक्यातील प्रतिनिधी न देता दुसऱ्या तालुक्यातील प्रतिनिधी सरकारच्या माध्यमातून अधिकाऱ्यांवर दबाव आणून दिले जात आहेत.पन्नास वर्षांची परंपरा पंधरा मिनिटात मोडण्यात येत आहे.विरोधकांना उमेदवार मिळाला नाही म्हणून त्यांनी नेहमीच बदलला असा आरोप ही एकनाथ खडसेंनी केला आहे.फॉरेन्सिक ऑडिट अथवा कुठल्याही वकिलाकडून चौकशी करा अथवा हव्या त्या एजन्सीकडून चौकशी करा माझी तयारी आहे आणि त्यात शोधून दाखवा..एक रुपयाची सुद्धा चोरी केलेली नाही असे आव्हान एकनाथ खडसे यांनी दिले आहे.लोकशाही पद्धतीने सर्वांना सोबत घेऊन कारभार केला म्हणूनच दूध संघ प्रगतीवर आला असे म्हणत सरमजामशाही करणाऱ्यांना खडसे यांनी जोरदार उत्तर दिले.मी शिस्तीचा भोक्ता आहे.मला भ्रष्टाचार बिलकुल चालत नाही.भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी भाग पाडले.एकनाथ खडसे व माझे पॅनल विरोधात शिंदे गट व भाजपचे नेते एकवटले आहेत.ताकद है तो..लढो..,गेली ४० वर्ष लढलो …जिंकत आलोय…जनता माझ्या पाठीशी आहे त्यामुळे मला आता कसली चिंता नाही..मात्र निवडणुकीत उभे राहण्यासाठी यांनी हे उद्योग केले.गिरीश महाजन असतील,गुलाबराव पाटील असतील,आमदार मंगेश चव्हाण असतील,जे त्या गावचे स्थानिक रहिवासी नाहीत..मात्र शासनाच्या दडपणाखाली जिल्हा दूध संघ निवडणुकीबाबतचा निर्णय त्यांनी त्यांच्या बाजूने लावून घेतला याबाबत छाननीनंतर उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे खडसे यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.