बीड-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
बीडच्या माजलगाव शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.एका खाजगी रुग्णालयात दीड महिन्याच्या बाळाला मुदत बाह्य डोस दिल्याचा प्रकार समोर आला आहे त्यामुळे संबंधित डॉक्टरांवर कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली आहे.माजलगाव शहरात पवार हॉस्पिटल या नावाने बाल रुग्णालय आहे आणि याच रुग्णालयात अशोक धारक यांच्या मुलीची प्रसूती दीड महिन्यांपूर्वी झाली होती.बाळाला डोस पाजण्याकरता धारक कुटुंबीयांनी पवार हॉस्पिटलमध्ये आणले होते.या दीड महिन्यांच्या बाळाला डोस देण्यासाठी बाळाचे आजोबा अशोक धारक हे माजलगाव शहरातील पवार हॉस्पिटलमध्ये गेले तेथे बाळाला रोटाव्हायरस हा डोस पाजण्यात आला तर न्यूमोकोकल हा डोस मांडीमध्ये टोचवण्यात आला मात्र बाळाच्या आजोबांनी डोसवरील तारीख बघितली आणि धक्काच बसला.मुदत संपून आठ महिने झालेला डोस बाळाला देण्यात आला होता.
डोस पाजून झाल्यानंतर मुदतबाह्य डोस बाळाला पाजल्याचे लक्षात आल्याने नातेवाईकांनी याबाबत डॉक्टरांना विचारणा केली असता त्यांनी बाळाला काही काळ निगराणीत ठेवले मात्र हा हलगर्जीपणा दीड महिन्याच्या बाळाच्या जीवावर उठला असता त्यामुळे संबंधित डॉक्टरांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.दरम्यान अशा डॉक्टरांवर कारवाई होणे गरजेचे असल्याची मागणी जनतेतून पुढे येत आहे.या धक्कादायक प्रकारामुळे नातेवाईकांमध्ये भिती निर्माण झाली आहे.डॉक्टर पवार आणि त्यांच्या रुग्णालयावर आरोग्य विभाग कोणती कारवाई करणार?याकडे लक्ष लागून राहिले आहे.