वाशीम-मंगरुळपीर :- पोलीस नायक (वृत्तसेवा) :-मंगरुळपीर वयोवृद्ध महिला सुमनबाई गेंदुलाल रावपलाई यांचे वृद्धापकाळाने १ सप्टेंबर रोजी निधन झाले.वृद्धत्वाने निधन झालेल्या आईला सात मुलींनी खांदा देऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.
मंगरुळपीर येथील रहिवाशी व कुंभकार समाजातील सुमनबाई गेंदुलाल रावपलाई यांचे १ सप्टेंबर रोजी वृद्धापकाळामुळे निधन झाले होते.आईच्या निधनानंतर त्यांच्या सात मुली अंत्यसंस्काराकरीता आल्या व अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.यावेळी या सात मुलींनी आईच्या पार्थिवास खांदा देऊन मुला-मुलींमधील भेदभाव नाहीसा करीत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.यावेळी अग्निडागही या सात मुलींनी दिला आहे हे विशेष.याप्रकाराबाबत या सात मुलींचे सर्वत्र कौतुक होत आहे.