परभणी पोलीस नायक(वृत्तसेवा):-
पती-पत्नीचा सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी नातेवाईकांची बैठक बसली असतानाच सासरच्या मंडळीने विवाहितेस जीवे मारण्याच्या उद्देशाने विष पाजल्याची घटना परभणीच्या पाथरी शहरातील राजनगर भागामध्ये घडली आहे हा प्रकार घडल्यानंतर नातेवाईकांनी विवाहितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.उपचार सुरू असताना विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या मंडळी विरोधात पाथरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
तस्सलुम बेगम या विवाहितेचा सासरच्या मंडळीकडून छळ करण्यात येत असल्यामुळे विवाहितेच्या काकाच्या घरी सदरील प्रकार मिटवण्यासाठी नातेवाईकांची बैठक बोलवण्यात आली होती.मात्र बैठकीमध्ये तडजोड करणे ऐवजी सासरच्या मंडळीने तस्सलुम बेगम या विवाहितेला विष पाजले.विष पाजल्यामुळे तस्सलुम बेगम या बेशुद्ध पडल्याने त्यांना नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले.पाथरी येथे प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये हलवण्यात आले होते.परभणी येथे उपचार सुरू असताना विवाहिता तस्सलुम बेगम यांनी दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या मंडळी विरोधात पाथरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा अधिक तपास पाथरी पोलीस करत आहेत.सासरच्या मंडळींनी चक्क वाद मिटवण्यासाठी बैठक सुरू असताना विवाहितेला विष पाजल्यामुळे नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.