Just another WordPress site

धनगर समाजाचे लढाऊ नेते लक्ष्मण हाके यांच्याकडे उद्धव ठाकरेंनी सोपविले प्रवक्तेपद

सोलापूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-

शिवसेनेतील फुटीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून बंडखोरांवर हल्ला चढवण्यासाठी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जात आहे. राष्ट्रवादीतून आलेल्या सुषमा अंधारे यांच्याकडे उपनेतेपदाची जबाबदारी दिल्यानंतर काही महिन्यांपूर्वीच पक्षात प्रवेश केलेल्या लक्ष्मण हाके यांना उद्धव ठाकरेंकडून प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य आणि धनगर समाजाचे सांगोला येथील लढाऊ नेते अशी ओळख असलेल्या हाके यांच्याकडे प्रवक्तेपद देण्यात आले असून आगामी काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची बाजू भक्कमपणे मांडण्याचा हाके यांचा प्रयत्न असणार आहे.धनगर समाजातील युवकांमध्ये लोकप्रिय असलेल्या लक्ष्मण हाके यांना प्रवक्तेपदाच्या रुपाने संधी मिळाल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला माढा,बारामती,सांगली,परभणी यासह धनगर बहुसंख्य असणाऱ्या ११ लोकसभा मतदारसंघात चांगला फायदा होण्याची शक्यता आहे.

लक्ष्मण हाके यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. शेकापचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांचा पराभव झाला.शिवसेनेकडून शहाजीबापू पाटील यांनी देशमुखांना पराभूत केले.या निवडणुकीत हाके यांना फार मते मिळाली नव्हती मात्र आता उद्धव ठाकरे यांनी ताकद दिल्याने ते आगामी निवडणुकीत विद्यमान आमदार शहाजी पाटील यांच्यासमोर आव्हान उभे करू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.