पोलीस नायक(वृत्तसेवा):-
मुंबई पोलिस दलामधील २८ पोलिस उपायुक्तांच्या नुकत्याच खात्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या.काही दिवसांपूर्वी बदली होऊन मुंबईत आलेले आणि नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उपायुक्तांच्या नेमणुका करण्यात आल्या असून या करताना अनेकांच्या जबाबदारीत अदलाबदल करण्यात आला आहे.पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी हे बदल्यांचे आदेश जारी केले आहे.
राज्यातील १०९ पोलिस उपायुक्त,अधीक्षक दर्जाच्या गेल्या आठवड्यात बदल्या करण्यात आल्या.यामध्ये १४ अधिकाऱ्यांची बदली मुंबईत दाखविण्यात आली आणि हे अधिकारी नेमणुकीच्या प्रतीक्षेत होते.शनिवारी सायंकाळी त्यांच्या नेमणुकीचे आदेश जारी करण्यात आले.त्यांच्या नियुक्त्या करताना मुंबईत असलेल्या उपायुक्तांचे विभाग बदलण्यात आले आणि त्यांच्याकडे वेगळी जबाबदारी देण्यात आली.बदल्या दर्शविण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये अभिनव देशमुख (परिमंडळ दोन),अकबर पठाण (परिमंडळ तीन),प्रवीण मुंढे (परिमंडळ चार),मनोज पाटील (परिमंडळ पाच),हेमराज राजपूत (परिमंडळ सहा),पुरुषोत्तम कराड (परिमंडळ ७),दीक्षितकुमार गेडाम (परिमंडळ आठ),अनिल पारसकर (परिमंडळ ९),अजय बन्सल (परिमंडळ ११),संजय लाटकर (बंदर परिमंडळ) यांचा समावेश आहे.प्रशांत कदम आणि कृष्णकांत उपाध्याय यांच्याकडे गुन्हे शाखेची जबाबदारी देण्यात आली असून समाजसेवा शाखा असलेल्या उपायुक्त अंमलबजावणी या ठिकाणी डी. एस.स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सध्या सर्वाधिक महत्त्वाच्या असलेल्या सायबर विभागाच्या उपायुक्तपदाचा भार बाळसिंग रजपूत यांच्याकडे तर नियंत्रण कक्षासह इतर जबाबदाऱ्या असलेल्या अभियान विभागाची जबाबदारी विशाल ठाकूर यांच्याकडे देण्यात आली आहे.बदली झालेल्या इतर अधिकाऱ्यांमध्ये एम.रामकुमार (मुख्यालय १),गौरव सिंग (वाहतूक (दक्षिण),तेजस्वी सातपुते (मुख्यालय २),मंगेश शिंदे (वाहतूक पश्चिम उपनगर),मोहितकुमार गर्ग (प्रतिबंधक),राजू भुजबळ (वाहतूक पूर्व उपनगरे),विनायक ढाकणे (सशस्त्र पोलिस दल),प्रकाश जाधव (अमली पदार्थ विरोधी पथक), संग्रामसिंग निशाणदार (आर्थिक गुन्हे शाखा),प्रज्ञा जोडगे (सशस्त्र पोलिस दल),योगेशकुमार गुप्ता (जलद प्रतिसाद पथक),श्याम घुगे (सुरक्षा), नितीन पवार (सशस्त्र पोलिस दल) यांचा समावेश आहे.