यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील बाबुजीपुरा परिसरात राहणारे सामाजीक कार्यकर्ते व केळीचे प्रसिद्ध व्यापारी तसेच नगर परिषदचे माजी नगरसेवक तथा नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान संचालक गुलाम रसुल अब्दुल नबी उर्फ (जग्गा शेठ ) यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी आज दि. १३ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
दिनांक १४ नॉव्हेबर रोजी सकाळी ९ वाजता त्यांची अंत्ययात्रा बाबुजीपुरा येथील त्यांच्या निवासस्थानाहुन निघणार आहे.त्यांच्या पश्चात कुटुंबात तिन मुले,सुना,नातवंडे असा मोठा परिवार असून ते यावल नगर परिषदचे माजी उपनगराध्यक्ष असलम शेख नबी यांचे ते मोठे बंधु होत.त्यांच्या निधनामुळे परिसरात दुःख व्यक्त होत आहे.