यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेची सन २०२२ ते सन २०२७ या कालावधीसाठीची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली.रविवार दि. १३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत डॉ.सतिश सुपडू यावलकर यांची अध्यक्षपदी तर हेमंत एकनाथ चौधरी यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
या बैठकीस सर्व नवनिर्वाचीत संचालक उपस्थीत होते नवनियुक्त संचालक मंडळ पुढील प्रमाणे आहे.सतिश सुपडू यावलकर(अध्यक्ष ),हेमंत एकनाथ चौधरी(उपाध्यक्ष ),शरद वासुदेव यावलकर,अभिमन्यु फत्रु बडगुजर,जगदिश रत्नाकर कवडिवाले ,महेश वासुदेव वाणी,यशवंत वना सोनवणे,दिलीप पद्माकर नेवे,सुरेश गणपत वाणी,किरण बालजी अट्रावलकर,नितीन त्रंबक हडपे व सुनिता विलास गडे उपस्थित होते.
यावेळी अभिमन्यु बडगुजर,जगदिश कवाडिवाले,हेमंत चौधरी बँकेचे सीईओ चंद्रकांत वाणी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी बोलतांना बँकेला प्रगतीपथावर नेण्यासाठी योग्य निर्णय व कठोर परिश्रम करू असे निवड झालेल्या नवनिर्वाचित अध्यक्ष सतिश यावलकर यांनी सांगितले.प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक जे.बी.बारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम.पी.भारंबे यांनी काम पाहीले.