Just another WordPress site

किर्तीकर राजीनामा देत नाहीत तो पर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही-संजय निरुपम यांचा इशारा

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-

खासदार गजानन किर्तीकर यांनी काही दिवसांपूर्वी बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटात प्रवेश केला यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला.त्यांच्या या प्रवेशावरून काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.किर्तीकर यांचा हा पक्षप्रवेश म्हणजे मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघातील मतदारांना दिलेला धोका असल्याचे ते म्हणाले तसेच किर्तीकर राजीनामा देत नाहीत तो पर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही असा इशाराच संजय निरुपम यांनी दिला आहे.

उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.पक्ष सोडण्याचा निर्णय त्यांचा होता त्यावर मला काही बोलायचे नाही.त्यांनी का आणि कोणत्या अमिषाला बळी पडून पक्ष सोडला यातही मला जायचे नाही.पण माझे असे मत आहे की, शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार म्हणून तुम्ही निवडणूक लढवली होती व धनुष्य-बाण चिन्हावर तुम्ही निवडून आला होता.आता जेव्हा तुम्ही पक्ष सोडला आहे त्यामुळे तुम्हाला आता संसद सदस्य म्हणूनही राजीनामा द्यायला हवा आणि ही गद्दारी असल्याचे संजय निरूपम म्हणाले आहेत.तसेच ज्या पक्षाने तुम्हाला सगळे काही दिले,ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी,मतदारांनी तुम्हाला जास्तीत जास्त मत देऊन निवडून आणले आहे त्यांच्याशी तुम्ही विश्वासघात केला अशी टीकादेखील संजय निरुपम यांनी गजानन कीर्तिकर यांच्यावर केली आहे.तुम्हाला जास्त मत मिळाली म्हणून तुम्ही निवडून आला आणि कमी मिळाली त्यामुळे मी पराभूत झालो त्यामुळे तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल अशी मागणी संजय निरुपम यांच्याकडून करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.