मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
कुठल्याही गुन्ह्याच्या काही गाईडलाइन्स असतात.कोणत्या दृष्टीने तो विनयभंग वाटतो?मग एवढीच जर काळजी होती तर गर्दीत यायचे नव्हते. एक तर मुख्यमंत्र्यांच्या कालच्या कार्यक्रमाला भाजपचे कुणीही उपस्थित नव्हते.त्या एकट्याच बाई आल्या होत्या.याआधीही त्यांनी आव्हाडसाहेबांवर अश्लाघ्य टीका केलीये.ज्यावेळी खासदार आणि आव्हाडसाहेबांमध्ये तू तू मैं मैं झाले त्याचवेळी माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली अन् शेवटी रात्री जे व्हायचे ते झाले…खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यांना मला सांगायचे आहे की,मर्द असाल तर कामातून उत्तर द्या, नामर्दासारखे बाईला पुढे करुन लढाई लढू नका” असे थेट आव्हानाच राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी विरोधकांना दिले आहे.जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कळवा-मुंब्रा शहरात राजकीय वातावरण तापले आहे.चौकाचौकात आव्हाड समर्थकांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.आव्हाडांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते घोषणाबाजी करण्यात येत आहे.तर राज्य शासनाविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष आहे अशातच जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सत्ताधाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.
ज्या महिलेने जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात तक्रार केली त्या भाजपच्या कार्यकर्त्या आहेत का?याचा शोध घेतला पाहिजे कारण काल मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला भाजपचे कुणीच आले नव्हते.त्या एकट्याच तिथे आल्या होत्या.मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर प्रचंड गर्दी असताना आव्हाडसाहेबांनी त्यांना गाडीसमोरुन बाजूला करण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी व्हिडीओमध्ये प्रचंड गर्दी असताना एवढ्या समोर का थांबलात असे आव्हाड संबंधित महिलेला म्हणत आहेत.बरे हे सगळे मुख्यमंत्र्यांपासून १५ फुटांवर घडते आहे…एखादा गुन्हा दाखल करताना त्या गुन्ह्याला काही गाईडलाइन्स असतात.आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करताना कोणत्या दृष्टीने तो विनयभंग वाटतो?असा सवाल करतानाच मर्द असाल तर सत्ताधाऱ्यांनी कामातून उत्तर द्यावं.बाईला पुढे करुन लढाई लढू नये”,अशा शब्दात ऋता आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे.असे गुन्हे दाखल करुन आव्हाडांच्या राजकीय करिअरची हत्या करण्याचा प्रयत्न होतो आहे.पण त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी आव्हाडांचे राजकीय करिअर संपणार नाही त्यांच्या राजकीय करिअरची हत्या होणार नाही असे सांगत ऋता आव्हाडांनी सत्ताधाऱ्यांना ललकारले.बाईचा बालिशपणा आहे आणि त्याला सत्ताधाऱ्यांची साथ आहे.सत्ताधाऱ्यांचे हे वागणे बर नव्हे” अशी नाराजीही ऋता आव्हाडांनी बोलून दाखवली.