Just another WordPress site

५ सप्टेंबर रोजी राणा दाम्पत्य जळगाव जिल्हा दौऱ्यावर

जळगाव येथे हनुमान चालीसा म्हणण्याकरिता राणा दाम्पत्य उपस्थित राहणार

जळगाव-पोलीस नायक (जिल्हा प्रतिनिधी) :- मातोश्री बंगल्यावर हनुमान चालीसा पठणावरून  संपुर्ण भारतभर चर्चेत असलेले युवा स्वाभिमान पार्टीचे संस्थापक अध्यक्ष तथा बडनेराचे आमदार रवीभाऊ राणा व पार्टीच्या कुशल मार्गदर्शिका सौ.नवनीत राणा हे दाम्पत्य दि.५ सप्टेंबर २२ रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याची माहिती युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ पाटील,जिल्हा युवासेना अध्यक्ष अक्षय शिंदे व सोशल मीडिया प्रसिद्धी प्रमुख दीपांशु लोणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

जळगाव येथील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक कैलास अप्पा सोनवणे यांनी बसविलेल्या गणेश मंडळामध्ये हनुमान चालीसा म्हणण्याकरिता युवा स्वाभिमान पार्टीचे संस्थापक अध्यक्ष तथा बडनेराचे आमदार रवीभाऊ राणा व पार्टीच्या कुशल मार्गदर्शिका सौ.नवनीत राणा या दाम्पत्याला आमंत्रित करण्यात आले असून राणा दाम्पत्याने हे आमंत्रण स्वीकारले असल्यामुळे राणा दाम्पत्य हे  दि.५ सप्टेंबर २२ रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान दि.५ रोजी संध्याकाळी ७.३० वाजेदरम्यान राणा दाम्पत्य हे या कार्यक्रमात हनुमान चालीसा पठण करणार आहेत.आमदार रवीभाऊ राणा व खासदार सौ.नवनीत राणा यांना केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा बहाल केली आहे.त्यामुळे वाय दर्जाची सुरक्षा असलेली व्यक्ती प्रथमच जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे.त्याचबरोबर मातोश्री बंगल्यावर हनुमान चालीसा पठणावरून आमदार रवीभाऊ राणा व खासदार सौ.नवनीत राणा हे दाम्पत्य संपूर्ण भारतभर चर्चेत राहिलेले आहे.राणा दाम्पत्याच्या जळगाव भेटीमुळे कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.तरी जिल्हाभरातील युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी.असे आवाहन युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ पाटील,जिल्हा युवासेना अध्यक्ष अक्षय शिंदे व सोशल मीडिया प्रसिद्धी प्रमुख दीपांशु लोणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.