Just another WordPress site

बँकेकडून कर्जवसुली नोटिशीच्या तणावातून शेतकऱ्याची आत्महत्या

अकोला-पोलीस नायक(वृत्तसेवा):-

अकोला जिल्ह्यात सोयाबीन आणि तूर उत्पादक शेतकऱ्याने त्यांच्याच शेतात कीटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्या केली.किशोर श्रीराम गवळे (वय ४८,रा.वाई,ता.मूर्तिजापुर)असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.काही दिवसांपूर्वी त्यांना बँकेकडून कर्जवसुलीची नोटीस आली होती.डोक्यावर वाढलेल्या कर्जातून आपले शेत जाणार या भीतीने किशोर गवळे यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे.दरम्यान याप्रकरणी माना पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास करीत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर तालुक्यातल्या वाई गावातील रहिवासी किशोर श्रीराम गवळे यांच्याकडे चार एकर शेती आहे.शेतीसाठी त्यांनी बँकांकडून पीक कर्ज घेतले होते मात्र नापिकेमुळे अनेकदा गवळे हे मोठ्या संकटात सापडले त्यात बँकेचे कर्ज आणि त्याचे व्याजही वाढत गेले.काही दिवसांपूर्वी त्यांना बँकेकडून कर्ज वसुलीची नोटीस मिळाली.७ दिवसांच्या आत कर्जाची रक्कम भरण्यात यावी अन्यथा न्यायालयाद्वारे तुमच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि अशा परिस्थितीत खटल्यातील खर्च आणि परिणामांसाठी पूर्णपणे जबाबदारी तुमची असेल अशा नोटीसनंतर गवळे चांगलेच तणावात होते.

या तणावातून त्यांनी शेती विकण्याचा निर्णय घेतला यासंदर्भात त्यांनी पत्नी आणि मुलाशीही चर्चा केली मात्र दोघांनीही शेती विकण्यासाठी त्यांना नकार दिला आणि दुसरा पर्याय बघू असे सांगितले परंतू गवळे यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल घेतले.त्यांनी स्वतःच्या शेतात कीटकनाशक प्राशन करुन आपले जीवन संपवले.या प्रकरणात मुर्तीजापूर तालुक्यातल्या माना पोलिसांनी आकस्मित मूर्तीची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे.डोक्यावर वाढत्या कर्जामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाजही पोलिसांनी व्यक्त केला आहे. गवळे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. या आत्महत्येच्या घटनेने गावात सर्वांना धक्का बसलाय.विदर्भ कोकण ग्रामीण बँकेकडून मिळाले नोटीस मध्ये नमूद आहे की, आपण ५० हजार रुपयांचे पीक कर्ज घेतले होते. ८८ हजार, ८३ हजार ७२६ आणि ८९ हजार ८७४ रूपये कर्ज आणि एकूण थकबाकी ४ लाख २२ हजार १०४ रुपये असून तुमच्यावर देय आणि देय कर्जाची रक्कम भरण्याची मागणी अनेक वेळा केली. पण, तुम्ही कर्जाची रक्कम फेडण्यास टाळाटाळ करत आहात. त्यामुळे तुम्हाला या नोटीसद्वारे सूचित करण्यात येत आहे की ही नोटीस मिळाल्यापासून ७ दिवसांच्या आत ४ लाख २२ हजार १०४ रुपये इतकी कर्जाची रक्कम भरावी. अयशस्वी झाल्यास कायद्याच्या कोर्टात तुमच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यास भाग पाडेल. अशा परिस्थितीत तुम्ही खटल्यातील खर्च आणि परिणामांसाठी पूर्णपणे जबाबदार असाल. अशाप्रकारे बँकेकडून नोटीस प्राप्त झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.