Just another WordPress site

बैलगाडीवरून पडला व बोलेरोने चिरडले,सात वर्षाच्या चिमुकल्याचा करून अंत

दिलीप गणोरकर 

अमरावती विभाग प्रमुख

जिल्ह्यातील अचलपूरमधून एक अत्यंत हृदयद्रावक अशी घटना समोर आली आहे.अचलपूर येथे घडलेल्या एका अपघाताने एका हसत्या खेळत्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.येथे खेळताना बैलगाडीतून एक सात वर्षांचा चिमुकला पडला आणि मागून येणाऱ्या वाहनाने त्याला चिरडल्याचा प्रकार घडला आहे.या घटनेनंतर या चिमुकल्याचे आजोबा रस्त्यावरच त्याच्या बाजुला बसून रडताना दिसून आले हे दृष्य पाहून तेथील उपस्थितांचेही मन हेलावून गेले.सोहम चौखंडे असे या चिमुकल्याचे नाव आहे.आई-वडील शेतमजुरीवर गेले असताना हा चिमुकला खेळण्यासाठी बैलगाडीत बसला मात्र कालांतराने त्याचा तोल सुटला आणि तो खाली घसरला.मात्र यावेळेस मागून भरधाव वेगात येणाऱ्या वाहनाने त्याला चिरडले यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला ही घटना जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली.अचलपूरमध्ये रासेगाव रोडवर ही आपघाताची घटना नुकतीच घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,सोहमचे आई-वडील शेतमजुरीसाठी गेले होते तेव्हा सोहम घरी एकटाच खेळत होता.दरम्यान खेळता-खेळता शेताच्या रस्त्याने जाणाऱ्या एका बैलगाडीवर तो बसला मात्र काही काळानंतर तो घसरुन जमिनीवर पडला त्याचवेळी मागून बोलेरो एम एच ३० बि डी ४७०३ भरधाव वेगात आली आणि सोहम त्या गाडीच्या चाकाखाली आल्याने तो पूर्णतः चिरडला गेला.कोणी काही करु शकेल त्यापूर्वीच काहीच क्षणात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशी केली आणि शवविच्छेदनानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी मिळालेल्या माहितीनुसार चार-पाच भावांमध्ये सर्वांना फक्त मुलीच होत्या सोहम सहा-सात बहिणींमध्ये एकटाच भाऊ होता.सोहमचा स्वभाव हा बोलका असल्याने तो अनेकांसोबत संवाद साधत गमती जमती करत असायचा.अचानक त्याच्यावर काळाची झडप पडल्याने सहा सात बहिणींचा एकटा भाऊ त्यांना पोरका करुन गेल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात शोक व्यक्त केल्या जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.