Just another WordPress site

अनैतिक संबंधातुन पत्नीने केला पतीचा खून;खुनाचा उलगडा झाला तीनमहिन्यानंतर !

चंद्रपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-

अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा पत्नीनेच काटा काढल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात घडली आहे.मात्र मोबाइल मधील कॉल रेकॉर्डिंगमुळे तब्बल ३ महिन्यांनी या खुनाचा उलगडा झाला.याप्रकरणी रंजना रामटेके (वय ५० वर्षे) आणि प्रियकर मुकेश त्रिवेदी (वय ४८ वर्ष)यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,श्याम रामटेके (वय ६६ वर्ष) यांचा 6 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता.हार्ट अटॅकने त्यांचा झोपेत मृत्यू झाल्याचे पत्नीकडून सांगण्यात आले होते त्यांचे वय पाहता सर्वाना ते खरेही वाटले.वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्या नागपुरात असलेल्या दोन्ही मुली वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी घरी आल्या व वडिलांचे अंत्यसंस्कारही केले.आई घरी एकटीच राहत असल्याने तिची लहान मुलगी ब्रह्मपुरी येथे राहण्यास आली त्यावेळी आईच्या मोबाईल मधील कॉल रेकॉर्डिंग ऐकताच तिला धक्का बसला.वास्तविक त्या मुलीने वडिलांच्या मृत्यूपूर्वी आईला एक मोबाईल दिला होता.या फोनमध्ये असलेली एक ऑडिओ क्लिप या मुलीच्या हाती लागली.या क्लिप मध्ये सदर आरोपी महिला आणि तिचा प्रियकर त्रिवेदी यांचे ६ ऑगस्ट २०२२ ला पहाटे २.१४ वाजता तब्बल १०.५७ मिनिटांचे संभाषण दिसले यामध्ये आपल्या पतीचा खून आपण कसा केला याची माहिती आरोपी महिला प्रियकराला देते.नवऱ्याचे हात बांधून,विष पाजुन आणि त्यानंतर उशीने तोंड दाबून आपण पतीचा खून केला असा उल्लेख आहे त्यानंतर त्रिवेदी याने अंथरूण नीट करून सकाळी सर्वांना हृदयविकाराने पतीचा मृत्यू झाला असे सर्वाना सांगण्याचा सल्ला दिल्याचेही त्या संभाषणात आढळले.यांनतर मुलीने थेट पोलीस स्टेशन गाठत आईविरुद्ध तक्रार दाखल केली पोलिसानी कसून चौकशी केली असता दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा मान्य करत खुनाची कबुली दिली.त्यानंतर पोलिसांनी रंजना रामटेके व प्रियकर मुकेश त्रिवेदी यांना अटक केली आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.