गोंदिया-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
गोंदिया ते कोहमारा मार्गावर बुधवारी रात्री टॅक्सी आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला.या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघांचा रुग्णालयात नेत असताना उपचारापूर्वीच मृत्यू झाला हा अपघात खूपच भीषण होता.पाटेकुर्रा गावाजवळ काळी-पिवळी टॅक्सी आणि ट्रकची समोरसमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला या अपघातात दोन्ही गाड्यांचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.या भीषण अपघातात श्यामसुंदर बंग,सूरज मुनेश्वर आणि अंबिका पांडे या तिघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य ६ जण गंभीर जखमी झाले आहेत.त्यांच्यावर गोंदिया जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.यामधील काही लोकांची प्रकृती चिंताजनक आहे.या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अपघातग्रस्त ट्रक गोंदिया येथून कोहमाराकडे जात होता.पाटेकुर्राजवळ ट्रकचा समोरील डाव्या बाजूचा टायर फुटल्याने ट्रक कंट्रोल झाला नाही त्यामुळे तो समोरील टॅक्सीवर आदळला या अपघाताची डुग्गीपार पोलिसांनी नोंद केली असून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या अपघातामुळे जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांचा बंदोबस्त वाढवल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांनी दिली आहे.