Just another WordPress site

‘श्रीमान राहुल गांधी तुम्ही कधी इतिहासाचा अभ्यास केला आहे का?’राम कदम यांचा खोचक प्रश्न

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात केलेल्या विधानामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे.आपल्या भारत जोडो यात्रेदरम्यानच्या भाषणामध्ये राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती.त्यांना अंदमानमधील तुरुंगामध्ये कारावासासाठी पाठवण्यात आले तेव्हापासून ते ब्रिटीशांना चिठ्ठ्या लिहून माफी मागत होते असे विधान राहुल यांनी आपल्या भाषणामध्ये केल्याने भारतीय जनता पार्टीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.राहुल गांधींनी आज दुपारी यासंदर्भातील पत्रकार परिषद घेत सावरकरांनी लिहिलेल्या एका चिठ्ठीचाही संदर्भ देत आपले म्हणने प्रसारमाध्यमांसमोर मांडले मात्र राहुल यांच्या भूमिकेवरुन त्यांच्यावर टीका करताना भाजपाचे आमदार राम कदम यांनी सूचक शब्दांमध्ये भारत जोडोचा उल्लेख करत इशारा दिला आहे.

राम कदम यांनी प्रसारमाध्यमांसाठी जारी केलेल्या व्हिडीओमधून या प्रकरणावर भाष्य करताना राहुल गांधींनी कधी इतिहास वाचला आहे का असा प्रश्न उपस्थित केला आहे.“श्रीमान राहुल गांधी तुम्ही कधी इतिहासाचा अभ्यास केला आहे का? स्वातंत्रवीर सावरकरांचे बलिदान,त्याग, संघर्ष त्यांना झालेल्या यातना याबद्दल तुम्ही कधी वाचले आहे का?”असा प्रश्न राम कदम यांनी विचारला आहे.“केवळ ‘भारत जोडो’ यात्रेला देशाने नाकारले त्यामुळे बातम्यांमध्ये झळकण्यासाठी एका महान क्रांतीकाराबद्दल तुम्ही असे अपशब्द वापरणार?”असा प्रश्न उपस्थित केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.