Just another WordPress site

मुख्यमंत्र्यांना सत्ता जाण्याची भीती वाटत असल्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार व पालकमंत्री देण्यास उशीर

राष्ट्रवादी नेते आ.एकनाथराव खडसे यांची पत्रकार परिषदेत माहिती

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सत्ता जाण्याची भीती वाटत असल्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याआधी मंत्रिमंडळ विस्तार व आता पालक मात्रांच्या नियुक्त्या करण्यास उशीर केला जात असल्याची टीका राष्ट्रवादी कांग्रेसचे आमदार एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना केली आहे.

पत्रकारांशी संवाद साधतांना नाथाभाऊ पुढे म्हणाले की,जळगाव जिल्ह्यातील विरोधकांना माझ्यावर टीका केल्याशिवाय नागरिकांचे लक्ष वेधता  येत नाही.यात गेल्या ४० वर्षांपासून माझ्या विरोधात वेगवेगळे षडयंत्र रचले जात आहे.त्याचबरोबर माझ्या विरोधात कितीही विरोधी एकत्र आले तरी जिल्ह्यातील नागरिकांचे प्रेम माझ्यावर फार मोठे प्रेम असल्यामुळे मला संपवू शकणार नाही असे विरोधकांना खडसावून सांगितले.वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांवर अतिवृत्तीमुळे मोठे संकट कोसळले आहे.त्या संकटातून शेतकऱ्यांना मुक्त कर अशी प्रार्थना केली.त्याचबरोबर शासनाने अतिवृत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव अर्थसहाय्य देण्यात यावे.तसेच आधीही सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा केली होती मात्र अद्यापि त्या शेतकऱ्यांना मदत देण्यात आली नसल्याने सरकारने शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी अशी सरकारला विनंती करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.