पाडळसा ग्रामपंचायतीच्या विविध कामात झालेल्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी !!
गावकऱ्यांच्या वतीने मुख्यकार्यकारी अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील पाडळसा ग्रामपंचायतीच्या चौदा व पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून झालेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असल्याने याबाबतच्या कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी याबाबतच्या मागण्याचे निवेदन समस्त गावकऱ्यांच्या वतीने नुकतेच मुख्यकार्यकारी अधिकारी जळगाव यांना देण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,पाडळसे ग्रामपंचायत मार्फत २०१७ ते २०२१ या कार्यकाळात १४ वा वित्त आयोग व १५ व्या वित्त आयोगातून झालेली कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अफरातफर व भ्रष्टाचार झालेला आहे.या निवेदनात नमूद केले आहे की,ग्रामस्थांनी नामंजूर केलेले विषय ग्रामपंचायतीकडून मंजूर करण्यात येतात.तसेच ग्रामसभेत झालेले विषय फक्त कच्या कागदावर लिहून घेतले जातात त्याबाबत पुढील कुठलीही कारवाई केली जात नाही.त्याचबरोबर पोलीस प्रशिक्षण शिबिर,आरोग्य शिबिर,महिला बाल विकास अंतर्गत अंगणवाडी दुरुस्ती,महिला प्रसाधनगृह इत्यादी कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला असून या कामांची उच्चस्तरीय करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांना नुकतेच देण्यात आले.यावेळी भरत चौधरी,रमेश भोई,नामदेव कोळी,पांडुरंग कोळी,प्रशांत तायडे,समाधान कोळी,सुरज कोळी,कुंदन कोळी,संजय कोळी,छोटू बाविस्कर,सै.रज्जाक टकारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.तर निवेदनावर भरत चौधरी,रमेश भोई,नामदेव कोळी,पांडुरंग कोळी,प्रशांत तायडे,समाधान कोळी,सुरज कोळी,कुंदन कोळी,संजय कोळी,छोटू बाविस्कर,सै.रज्जाक टकारी,सुपडू भोई,प्रवीण केदारे,छगन भोई,अरुण चौधरी,आसिफ पटेल,मुकेश अडकमोल,यशवंत बऱ्हाटे,किरण तायडे,बाबुराव तायडे,संतोष भराडे,मुकेश तेली,गोविंदा कोळी,सुपडू बाविस्कर,कुंदन कोळी,दामोदर सोनवणे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थांच्या सह्या आहेत.