मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून भाजप नेत्यांकडून टीका केली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नुकतेच ट्विट करत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे त्यांनी राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी यांचे पत्र ट्विट केले आहे.“देश तुम्हाला नेहमीच विचारत आला आहेत की जर तुम्ही सावरकर यांच्या बद्दल काही विशिष्ट वाचल तर देशातील कित्येक पिड्या हा प्रश्न विचारत राहिलतील “अरे भाई आख़िर कहना क्या चाहते हो” असे लिहुन फडणवीसांनी गांधींना टोला लगावला आहे.