औरंगाबाद-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत.यावेळी त्यांनी पुन्हा एकदा भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.यावेळी त्यांनी मी शिवबंधन एक मिनिटांत सोडणार,किरीट भाऊंचा गंडा बांधून घेणार पण आपली एकच अट आहे, नारायण राणेंचा बंगला तुम्ही कधी तोडणार,बीकेसीचा हिशोब कधी देणार,या सर्वांच्या मागे ईडी कधी लावणार?असे सवाल उपस्थित करत त्यांनी किरीट सोमय्या यांना खोचक टोला लगावला यावेळी त्यांनी मनसेने केलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना जोरदार निशाणा साधला आहे.
सुषमा अंधारे या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत त्यांनी यावेळी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या हे त्यांच्या टार्गेटवर होते.मी शिवबंधन एक मिनिटांत सोडणार!किरीट भाऊंचा गंडा बांधून घेणार!! पण आपली एकच अट आहे,नारायण राणेंचा बंगला तुम्ही कधी तोडणार?बीकेसीचा हिशोब कधी देणार? या सर्वांच्या मागे ईडी कधी लावणार? असे सवाल उपस्थित करत त्यांनी किरीट सोमय्या यांना खोचक टोला लगावला आहे.यादरम्यान सुषमा अंधारे यांनी मनसेवर देखील जोरदार निशाणा साधला.राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.मनसेकडून ह्या वक्तव्याविरोधात आंदोलन करण्यात आले.मनसे नेहमी ड्रामा करते त्याचे नेहमीचेच आहे.गेले अडीच वर्ष त्यांनी हेच केले आहे ते ठरवून आंदोलन करतात अशी टीका अंधारे यांनी यावेळी मनसेवर केली आहे.