Just another WordPress site

गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या बदलीचे संकेत

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी):-गेल्या काही वर्षांपासून कोरोना संक्रमणामुळे तसेच राज्यातील एकंदरीत अदलाबदलीच्या परिस्थितीमुळे या वर्षीच्या प्रशासकीय बदल्यांना स्थगिती मिळाली होती.बदल्यांना स्थागिती असतांना काही प्रमाणात बदल्या या करण्यात आल्या.यात जिल्हाधिकारीअभिजित राऊत व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे या दोघांचा कार्यकाळ हा पूर्ण झालेला असल्यामुळे कोरोना संक्रमण वाढण्याआधी व गणेशोत्सव आटोपताच जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे या दोघांची बदली होणार असल्याचे संकेत सूत्रांनी दिले आहे.

राज्यातील बहुतांशी अधिकाऱ्यांच्या बदल्या या रखडल्या आहेत यात कोरोना काळ व राज्यात नुकतेच झालेले सत्तांतर यामुळे बदल्यांचे समीकरण कोलमडले आहे.पोलीस विभागासह इतर सर्व विभागातील बदल्या या देखील शासनाच्या आदेशामुळे रखडल्या आहेत.बदल्या रखडल्याने अनेकांचे नियोजन चुकले असून कित्येक अधिकारी व कर्मचारी हे  पदोन्नती च्या प्रतीक्षेत आहेत.यात जिल्ह्यातील अनेक अधिकाऱ्यांसह सहाय्यक अधीक्षक व पोलीस निरीक्षक यांच्या बदलाचा समावेश राहणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.