Just another WordPress site

आफताबने श्रद्धाचे शिर तलावात फेकले पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-

महाराष्ट्रातील पालघर येथील रहिवासी असणाऱ्या श्रद्धा वालकर या तरुणीच्या खूनाने संपूर्ण देश हादरला आहे.मृत श्रद्धाचा प्रियकर आफताब पूनावाला याने सहा महिन्यापूर्वी श्रद्धाचा निर्घृण खून केला आहे.आरोपीने श्रद्धाच्या शरीराचे सुमारे ३५ तुकडे करून जंगलाच्या विविध भागात फेकले आहेत.या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपीला अटक केली असून श्रद्धाच्या शरीराचे तुकडे गोळा करण्याचे काम केले जात आहे.दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत श्रद्धाच्या शरीराचे १७ तुकडे गोळा केले आहेत.हे सर्व तुकडे फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत यानंतर आता या हत्येप्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे.आरोपीने श्रद्धाचे शिर मैदान गढी येथील तलावात टाकल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.यानंतर पोलिसांनी रविवारी मैदान गढी येथील तलाव रिकामा करायला सुरुवात केली आहे.हा तलाव रिकामा केल्यानंतर श्रद्धाच्या शरीराचे तुकडे याठिकाणी मिळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तसेच आफताब पोलिसांना खरे बोलतोय की गुंगारा देण्याचा प्रयत्न करतोय हेही लवकरच स्पष्ट होणार आहे.श्रद्धाचा खून सहा महिन्यांपूर्वी झाल्याने तिचे शिर योग्य स्वरुपात आढळण्याची शक्यता खूप कमी आहे पण तिच्या शरीराचा छोटासा भागही सापडला तरी त्याची डीएनए चाचणी करता येऊ शकते असे फॉरेन्सिक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

आरोपी आफताफ पूनावाला याला मंगळवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे त्यामुळे दिल्ली पोलिसांच्या हातात अवघे दोनच दिवस उरले आहेत म्हणून दिल्ली पोलिसांकडून वेगाने तपास केला जात आहे.याच पार्श्वभूमीवर महत्त्वाचा पुरावा शोधण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून मैदान गढी येथील तलाव रिकामा केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.