मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शुधांशू त्रिवेदी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे.या द्वयींच्या विधानामुळे राज्यात सध्या संताप व्यक्त केला जात आहे.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच भाजपाने महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे.तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन याबाबत शिंदे गटाची भूमिका काय आहे? ते स्पष्ट करावे अशी मागणी उद्धव ठाकरे गटाने केली आहे असे असतानाच या सर्व वादावर शिंदे गटातील नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रकरणी संवाद साधण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतील असे सामंत म्हणाले ते मुंबईत (२० नोव्हेंबर) रोजी प्रसिद्धीमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.या संदर्भात स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी चर्चा करतील.आम्ही सगळेच छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करणारे लोक आहोत.शिवाजी महाराज यांच्याबद्दल सर्वांनीच आदराने बोलले पाहिजे अशी आमची भूमिका आहे असे उदय सामंत म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आराध्य दैवत आहे.शिवाजी महाराज यांच्याविषयी प्रत्येकाने आदरानेच बोलले पाहिजे.एखादी व्यक्ती वैयक्तिक पातळीवर जे बोलली तेच सरकारचे मत आहे असे मानने चुकीचे आहे असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांविषयी केलेल्या विधानानंतर भाजपावर टीका केली जात आहे.यावर भाजपाची भूमिका काय असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.