चंद्रकांत खैरे पुढे म्हणाले अब्दुल सत्तारांनीही तेच केले मात्र सत्तार नावाचा हा हिरवा साप संभाजीनगर कधीच म्हणत नाही ते औरंगाबाद म्हणतात.एकदा डीपीडीसीमध्ये मी माईकने मारणार होतो.तेव्हा पतंगराव कदम माझ्या बाजूला होते.ते म्हणाले खैरे तुम्ही पालकमंत्री होता असे मारामाऱ्या करू नका.मी पतंगरावांना सांगितले की,सत्तार संभाजी महाराजांचा अपमान करतात.त्यांना काय सोडायचे?यांनी अनेक जमिनी हडपल्या आणि हे यांचे मंत्री आहेत असे म्हणत खैरेंनी सत्तारांवर सडकून टीका केली.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
औरंगाबाद-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी राज्याचे कृषिमंत्री आणि शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तार यांच्यावर सडकून टीका केली आहे. खैरेंनी सत्तारांना हिरवा साप म्हणत त्यांना एकदा माईकने मारणार होतो असे चंद्रकांत खैरेंनी सांगितले तसेच अब्दुल सत्तार संभाजीनगर कधीच म्हणत नाही नेहमी औरंगाबाद असेच म्हणतात असाही आरोप केला ते औरंगाबादमध्ये एका सभेत बोलत होते.चंद्रकांत खैरे म्हणाले, अब्दुल सत्तार म्हणाले की खैरेंचे काय राहिले,खैरेंच्या डोक्यावर गोमुत्र टाका.सत्तारांना हे कळत नाही की गोमुत्र किती पवित्र असते.आम्ही रोज घरात हिंदुत्वाप्रमाणे गोमुत्र शिंपडतो,आम्ही हिंदुत्व जाणतो मात्र हे वाटेल तसे बोलतात.सत्तार म्हणाले की मी आता पालकमंत्री म्हणून किती चांगले काम करत आहे.याआधी कोणीच काम केले नाही मात्र सत्तारांनी काम करून दाखवावे त्यांना या कामातले काय समजते.डीपीडीसी मध्ये काय चालले आहे हे काही समजते का?ते फक्त पैसे कसे मिळतील हे पाहतात.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी यांना काय नाही दिले असे असताना हे उद्धव ठाकरेंना सोडून गेले,शिवसेना सोडून गेले.तिकडे एकनाथ शिंदेंच्या मागेपुढे फिरून कॅबिनेट मंत्रिपद घेतले मात्र इकडे कॅबिनेट मंत्रिपद मिळाले नाही का?कशासाठी हे सर्व सुरू आहे?इथेही ते कॅबिनेट मंत्री होते असे चंद्रकांत खैरेंनी म्हटले आहे.