यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील एसटी आगाराने यंदाच्या दिवाळीच्या कार्यकाळात प्रवासी बस सेवेत जळगाव जिल्ह्यात पुनश्च उत्पन्नात आघाडी घेतली असल्याची माहीती आगार व्यवस्थापक दिलीप भागवत महाजन यांनी नुकतीच दिली आहे.याबाबत आगार व्यवस्थापकांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी माहीती देतांना सांगितले की,यावल आगारात एकुण ६२ एसटी वाहन असुन ११८ चालक व १३५ वाहक अशी संख्या आहे.मागील २०२० ते २०२१ हे दोन वर्ष कोरोना संसर्गाच्या गोंधळात निघुन गेली मात्र २०१९ च्या दिवाळीच्या काळात आगाराने १ कोटी ५८ लाख १३ हजारावर उत्पन्न मिळविले आहे.दोन वर्षाच्या काळानंतर आलेल्या या २०२२ च्या वर्षात कमी वाहनांची संख्या असतांना ही यावल आगाराने दिवाळीच्या कार्यकाळात यावल आगाराने १ कोटी ६७ लाख ७९ हजार रूपयांचे उत्पन्न मिळवण्यात यश मिळवले असल्याची माहीती आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी दिली.याशिवाय दोन दिवसापुर्वीच शेगाव येथे संपन्न झालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेसाठी एकुण ३५ बसेस सोडण्यात आली होती यात देखील आगारास ६ लाख १० हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले असेही माहीती देतांना त्यांनी सांगीतले.सदरील यश हे प्रवाशांच्या पाठिंब्याच्या जोरावर व आगारातील कर्मचाऱ्यांच्या मेहनतीतून शक्य झाले असल्याची भावना आगार व्यवस्थापक यांनी यावेळी बोलून दाखविली.
यंदाच्या दिवाळी काळात प्रवाशांसाठी नाशिक,औरंगाबाद,पुणे,शिरपुर,धुळे,सुरत,माहुरगढ आदी लांब पल्याच्या बसेस सोडण्यात आल्यात या उत्पन्नाच्या लक्ष प्राप्ती साठी या सर्व बसेस एकुण ४९०२६८ किलो मिटर एवढी धाव घेतली अशी माहीती आगार व्यवस्थापक दिलीप भागवत महाजन यांनी दिली यात त्यांनी त्यांचे सहकारी स्थानक प्रमुख जितेन्द्र जंजाळ,एटीआय संदीप अडकमोल व आगारातील सर्व कर्मचाराऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे हे फलीत असल्याचे त्यांनी यावेळी बोलतांना सांगीतले.सर्वत्र खाजगी वाहनांचा व अवैद्य प्रवासी वाहतुकीचा गोंधळ असतांना ही यावल आगारात ईतर आगाराच्या तुलनेत कमी बस वाहनाची संख्या असतांन मिळवलेले उत्पन्न हे लक्ष वेधणारे असल्याची प्रतिक्रिया यावल तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष जगदीश कवडीवाले यांनी दिली असुन त्यांनी आगार व्यवस्थापकाचे विशेष अभिनंदन केले आहे .