मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
तब्बल 103 दिवस तुरुंगात राहून परतल्यानंतर खासदार संजय राऊत काल पहिल्यांदाच दिल्लीला गेले.राज्यसभेमध्ये खासदार असलेल्या संजय राऊत यांचे सफदरजंग लेन येथील त्यांच्या निवासस्थानी दिल्लीतील शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले.यावेळी राऊतांनी मध्यप्रदेश किंवा काश्मीरमध्येच समारोपादरम्यान आपण भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले.