Just another WordPress site

यावलचे प्रभारी गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी अपघातात ठार

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात अमळनेरचे गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे जागीच ठार झाल्याची दुर्घटना घडली आहे.ते आपल्या शासकीय वाहनाने नाशिकला कामानिमित्त जात असतांना हा अपघात झाला आहे.
याबाबत माहिती अशी की,अमळनेर येथील गटविकास अधिकारी व यावलचे प्रभारी गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे आज दि.२३ रोजी पहाटे शासकीय कामासाठी अमळनेर-धुळे या मार्गाने ते नाशिकला जाण्यासाठी एमएच १९ डी व्ही ४१९९क्रमांकाच्या शासकीय वाहनाने नाशिकला जात होते.दरम्यान धरणगाव तालुक्यातील भोणे फाट्याजवळ त्यांच्या वाहनाने समोरच्या ट्रकला मागून धडक दिली.यात ड्रायव्हरच्या बाजूला बसलेले एकनाथ चौधरी हे जागीच ठार झाले.अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.तसेच गटविकास अधिकार्‍याचा मृत्यू झाल्याने प्रशासनातील कर्मचार्‍यांनी देखील अपघातस्थळ गाठले.दरम्यान शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत या घटनेची पोलीसात नोंद करण्यात आली आहे.एकनाथ चौधरी हे मूळचे धुळे जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या अमळनेर येथे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते.तर त्यांच्याकडे यावल येथील गटविकास अधिकारी पदाचा देखील अतिरिक्त कार्यभार होता.त्यांच्या अपघाती निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.