Just another WordPress site

व्यसनमुक्ती केंद्रात पाठविल्याच्या रागातून तरुणाने केला चार जणांचा खून

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 

दिल्लीच्या पालम भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या परिसरात एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आली आहे. मृतांमध्ये दाम्पत्यासह २२ वर्षीय तरुणी आणि आजीचा समावेश आहे.अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या २५ वर्षीय केशवने व्यसनमुक्ती केंद्रातून परतताच कुटुंबियांना संपवले आहे त्याला पोलिसांनी अटक केली आहे.दिनेश कुमार वय-४२ वर्षे,त्यांच्या पत्नी दर्शना सैनी वय-३८ वर्षे,दिवानो देवी वय ७५ वर्षे व उर्वशी वय-२२ वर्षे यांचा केशवने खून केला आहे आरोपी केशव हा बेरोजगार होता.ड्रग्जच्या आहारी गेल्याने कुटुंबियांनी त्याला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवले होते.दिल्लीच्या दक्षिण-पश्चिम भागात घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.या घटनेनंतर दोघांचे मृतदेह बाथरुममध्ये आढळून आले असून पोलीस तपास सुरू आहे.

दरम्यान आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कुटुंबियांमधील भांडणातून हा गुन्हा घडल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.पालम परिसरातून एका व्यक्तीने मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पोलिसांना फोन करून हत्येची घटना घडल्याची माहिती दिली होती.त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचताच त्यांना चारजण रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले.घटनेनंतर पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला शेजाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.