Just another WordPress site

दिशा सालियनचा १४ व्या मजल्यावरून पडून डोक्याला गंभीर इजा झाल्याने मृत्यू-सीबीआयचा मोठा खुलासा

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा पारा वाढवला होता.या प्रकरणात भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंपासून अनेकांनी गंभीर आरोप केले.राणेंनी या प्रकरणात शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवरही गंभीर आरोप केले मात्र आता या प्रकरणात सीबीआयने मोठा खुलासा केला आहे.सीबीआयने सादर केलेल्या अहवालात दिशाचा मृत्यू अपघातीच होता असे स्पष्ट करण्यात आले आहे त्यामुळे दिशाने आत्महत्या केल्याचा,बलात्कार झाल्याचा आणि खून झाल्याचे सर्व आरोप खोटे ठरले आहेत.सीबीआयने दिलेल्या अहवालात दिशा सालियनचा दारूच्या नशेत तोल गेल्याने आणि १४ व्या मजल्यावरून पडून डोक्याला गंभीर इजा झाल्याने मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.

दरम्यान नारायण राणेंनी दिशा सालियान खून प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात असल्याचा खळबळजनक आरोप केला होता.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिशा सालियानचा खून झाला तिच्यावर अत्याचार करून खून झाला.त्या प्रकरणातील आरोपींना का अटक झाली नाही. कोण मंत्री होता?का वाचवण्यात आले?सचिन वाझेंना पोलीस खात्यात आणून त्या मंत्र्याला वाचवले असे आरोप नारायण राणेंनी केले होते.आदित्य ठाकरे दिशा सालियान प्रकरणात होते अशी लोक चर्चा करतात.सचिन वाझेंनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला अशी पापे करायला मुख्यमंत्री झाला होता का?आता उत्तराखंड केसबद्दल बोलता.चुकीचे झाले असेल तर कारवाई होईल,आम्ही लपवणार नाही.मात्र दिशा सालियान सुशांतसिंह राजपूतबाबत केलेले पाप विसरता येणार नाही.आता तुमची सत्ता नाही त्यामुळे त्यातील आरोपी पकडले जातील असा इशाराही नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना दिला होता.

२०२० मध्ये अभिनेता सुशांतसिंह राजपूतची एकेकाळची मॅनेजर दिशा सालियनचा सुशांतचा मृत्यू होण्याच्या काही दिवसांआधी इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला.सुरुवातीला हे प्रकरण आत्महत्येचे असल्याचे म्हटले गेले नंतर पुढे या प्रकरणाला राजकीय वळण लागले आणि दिशावर सामूहिक बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप झाला.नारायण राणे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिशा सालियानवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला.यानंतर दिशा सालियानच्या आई-वडिलांनी राणेंविरोधात तक्रार दाखल केली त्यामुळे नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.याच प्रकरणाच्या तपासासंदर्भात मालवणी पोलिसांनी नारायण राणे आणि नितेश राणेंना समन्सही बजावले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.