बुलढाणा-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
शिंदे गटातील बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाडांनी ठाकरे गटातील खासदार संजय राऊत बोकडाची औलाद आहेत असे म्हणत जहरी टीका केली.यानंतर आता शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार विनायक राऊत यांनी आमदार गायकवाडांना एका वाक्यात प्रत्युत्तर दिले.यावेळी राऊतांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवरही प्रतिक्रिया दिली ते मंगळवारी (२२ नोव्हेंबर) बुलढाण्यात बोलत होते.संजय गायकवाडांनी संजय राऊतांवर केलेल्या टीकेविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारला.यावर विनायक राऊत म्हणाले,’असल्या घाणेरड्या औलादींना आम्ही जास्त किंमत देत नाही.’
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर विनायक राऊत म्हणाले,भगतसिंह कोश्यारींसारखा कुजक्या मेंदुचा माणूस हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीला मिळाला ही भाजपाची देणगी आहे. भगतसिंह कोश्यारींनी सातत्याने सावित्रीबाई फुले,जोतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे.भाजपाचे दुसरे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला.भाजपा जाणूनबुजून महाराष्ट्राचे दैवत,हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करून आपले खरे दात दाखवत आहेत अशीही टीका विनायक राऊतांनी केली.