राजस्थान-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
राजस्थानमध्ये क्रूरतेचाही कळस गाठलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे.एका मांत्रिकाने विवाहित तरुण आणि त्याच्या प्रेयसीची हत्या केली असून त्याची क्रूरता पाहून पोलीसही चक्रावले आहेत.मांत्रिकाने सर्वात प्रथम जोडप्याला शारिरीक संबंध स्थापित करण्यास सांगितले यानंतर त्याने त्यांच्यावर फेव्हिक्विक टाकले आणि चाकू,दगडाने त्यांच्या गुप्तांगावर वार करत हत्या केली.पोलिसांनी आरोपी मांत्रिकाला बेड्या ठोकल्या आहेत.१८ नोव्हेंबरला पोलिसांना सरकारी शिक्षक राहुल आणि त्याची प्रेयसी सोनू कुंवर यांचे मृतदेह सापडले होते. पोलिसांना मृतदेह सापडले तेव्हा त्यांच्या अंगावर कपडे नव्हते.यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता.७२ तासांत पोलिसांनी हत्येचा उलगडा केला आहे.
उदयपूरचे पोलीस अधिक्षक विकास कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार,दोघेही पीडित विवाहित होते.प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज होता.मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी ५० ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले आणि २०० लोकांची चौकशी केली. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनंतर मांत्रिक भालेक कुमार याला ताब्यात घेण्यात आले.चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली.मांत्रिक भालेश कुमार गेल्या सात ते आठ वर्षांपासून लोकांना तावीज देऊन त्यांच्या समस्या दूर करत होता.सोनू कुंवर आणि राहुल यांचे कुटुंबीय या मंदिरात येत होते याचवेळी राहुल आणि सोनू यांच्यात मैत्री झाली होती.याचमुळे राहुल आपल्या पत्नीसोबत नेहमी भांडत असे. यानंतर राहुलच्या पत्नीने मांत्रिक भालेशकडे मदत मागितली होती.मांत्रिकाने राहुलच्या विवाहबाह्य संबंधांविषयी तिला सर्व काही सांगितले. तसेच त्याने राहुलची प्रेयसी सोनूच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला होता.राहुल आणि सोनू यांनी भालेश कुमारला धमकी दिली होती.आपले भक्त आणि समर्थकांमध्ये बदनामी होईल या भीतीने भालेशने हत्येचा कट रचला.यासाठी त्याने बाजारातून फेव्हिक्विकची ५० पाकिटे खरेदी केली आणि एका बाटलीत सगळी भरली.१५ नोव्हेंबरच्या रात्री भालेशने राहुल आणि सोनू यांना मदत करण्याचा बहाणा करत बोलावले. यानंतर तो त्यांना गोगुंदा परिसरातील जंगलात घेऊन गेला.भालेशने घटनास्थळी पोहोचल्यानंतर दोघांनाही शारिरीक संबंध स्थापित करण्यास सांगितले.यानंतर त्याने फेव्हिक्विकने भरलेली बाटली त्यांच्या अंगावर ओतली.दोघांनाही काही कळण्याच्या आत ते चिकटले होते.त्यांनी वेगळे होण्याचा प्रयत्नही केला.पण यादरम्यान भालेशने चाकू आणि दगडाने त्यांच्यावर हल्ला केला.हत्या केल्यानंतर तो घटनास्थळावरुन फरार झाला होता.पोलिसांनी त्याला अटक केली आहे.