मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
आफताब दररोज मला मारहाण करत असून तो माझी हत्या करून माझ्या शरीराचे तुकडे करून फेकून देईल अशी लेखी तक्रार श्रद्धाने २३ नोव्हेंबर २०२० रोजी नालासोपारा येथील तुळींज पोलीस ठाण्यात केली होती.श्रद्धाची ही भीती खरी ठरली आहे.श्रद्धा ने केलेला हा अर्ज दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतला असून तो मोठा पुरावा ठरणार आहे.
श्रद्धाने २३ नोव्हेंबर २०२० मध्ये तुळींज पोलीस ठाण्यात आफताबच्या विरोधात तक्रार नोंदवली होती.त्या तक्रारीत तिने आफताब मागील सहा महिन्यापासून मारहाण करत असून त्याने तिला जीवे ठार मारण्याची धमकी देत शरीराचे तुकडे करून फेकून देण्यात येईल याबद्दल लिहले आहे.याबाबत आफताबच्या कुटुंबाला सुद्धा माहिती असल्याचे तिने खुलासा केला आहे.श्रद्धाने आफताब आणि ती लवकरच लग्न करणार असल्याचे सुद्धा सांगितले आहे.यामुळे जर वेळीच पोलिसांनी कारवाई केली असती तर आज श्रद्धा जिवंत राहिली असती.