यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेला यावल या शहराची ‘आदीवासी तालुका’अशी जिल्ह्यात ओळख आहे.यात यावल बस आगार हे उत्पन्नात जळगाव जिल्ह्यात अग्रस्थानी आहे तरी देखील जुनाट व अतिशय जिर्ण झालेले बसस्थानक हे उपेक्षीत असुन मागील पाच ते सहा वर्षापासुन प्रवासी या बसस्थानकाच्या नुतनीकरण कधी होणार?याच्या प्रतीक्षेत प्रवाशी वर्ग आहे.
यावल बस आगार हे सुमारे पन्नास वर्षापेक्षा अधिक जुने असुन संपुर्ण बसस्थानकची ईमारत जिर्ण झालेली आहे.नाशिक विभागात व जळगाव जिल्ह्यात प्रवासी सेवा व उत्पन्नात नेहमीच अग्रस्थानी राहणाऱ्या यावल आगाराच्या बसस्थानकाची अवस्था ही अत्यंत बिकट व दयानिय झाली आहे विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील जवळपास सर्वच बस स्थानकांच्या ईमारतीचे नुतनीकरण झालेले आहे मात्र यावल बस आगाराकडे लोकप्रतिनिधी व महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याची परिस्थिती आहे.विशेष म्हणजे यावल तालुक्यातील फैजपुर शहरातील बसस्थानकाचे नुतनीकरण झाले मात्र यावल बसस्थानकाचे नूतनीकरण का केले जात नाही?असा प्रश्न प्रवाशी वर्गामध्ये उपस्थित केला जात आहे.
पन्नासवर्षा पेक्षाही अधिक काळातील बांधलेले यावलच्या बसस्थानकाची अवस्था सर्व पातळीवर अतिशय जिर्ण झालेली आहे.जुनाट झालेल्या बसस्थानकातील भिंतीचे बांधकाम कोसळत आहे तरी देखील कुणी लक्ष देण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे.याविषयाला घेवुन प्रवासांचे हित लक्षात घेता यावल तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष जगदीश कवडीवाले यांनी सातत्याने बसस्थानकाची ईमारतीचे नुतनीकरण व्हावे याचा शासन दरबारी पाठपुरावा केला होता.मध्यांतरी सदरच्या बस स्थानकाच्या नुतन ईमारतीस निधी उपलब्ध झाल्याची चर्चा रंगु लागली होती मात्र खऱ्या अर्थाने पाठपुरावा झाला नसल्याने सदरच्या बसस्थानक नुतनीकरणाच्या कामाकडे सर्वांचे दुर्लक्ष झाल्याने अद्याप पर्यंत कामास मान्यता मिळत नसल्याचे दिसुन येत आहे.यावल आगाराला मागील तीन वर्षापासुन कायमस्वरूपी कार्य करणारे आगार व्यवस्थापक नसल्याने देखील अनेक समस्या निर्माण झाल्यात मात्र आता यावल आगारास दिलीप महाजन यांच्या रूपाने कायमस्वरूपी एक कार्यकुशल व अभ्यासु एसटी आगार व्यवस्थापक मिळाल्याने आगाराच्या प्रलंबीत जुनाट व जिर्ण झालेल्या नुतनीकरण ईमारतीसह ईतर प्रवासांच्या समस्यांचे निराकरण होईल अशी अपेक्षा प्रवाशी वर्गातून व्यक्त होत आहे .