यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
यावल येथील बस स्थानकातून सायंकाळी साडेसात वाजता सुटणारी यावल विदगाव मार्गे जळगाव बस गेल्या काही दिवसा पासून बंद असल्यामुळे प्रवाशीची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याची ओरड प्रवासीवर्गातून केली असल्याने ही बससेवा पूर्ववत सुरु करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
यावल आगारातून सायंकाळी साडेसात वाजता सुटणारी यावल ते जळगाव बस गेल्या काही दिवसां पासून बंद करण्यात आली असून ही बस जळगाव बसस्थानकाहुन रात्री ८ वाजता सुटल्यावर रात्री नऊ वाजता ही बस प्रवाशांना सोडण्यासाठी साकळी गावात येत असल्यामुळे प्रवाशांच्या सोयीचे असल्याने साकळी व परिसरातील ग्रामस्य प्रवाशी वर्गातून या बसला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता.या निमित्ताने रात्री उशीरा पर्यंत अमळनेर व चोपडा येथे गेलेले प्रवाशी किनगाव येथे येतात व किनगाव येथून साकळी,यावल येथे येण्यासाठी प्रवाशांना रात्रीची ऐकमेव बस असल्याने ही बससेवा अचानक बंद झाल्याने प्रवाशी वर्गाची विशेष करून महीला व लहान मुल यांची ताराबंळ होत आहे.
कोवीड १९ च्या प्रादुर्भाव हा आता पुर्णपणे हद्दपार झाल्याने सर्वत्र पुर्वीप्रमाणे बस सेवा सुरु करण्यात आल्या असूनदेखील यावल आगारातून यावल विदगाव मार्गे जळगाव बस अद्यापही सुरु झाली नसल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.तरी आगार व्यवस्थापक यांनी लक्ष पुरून देऊन यावल आगारातून बंद असलेली यावल जळगाव बस पूर्ववत सुरु करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.