“ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही अशांना राज्यपाल म्हणून नेमले जाते का?”उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारला प्रश्न
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
महाराष्ट्रात मागील काही दिवसांमध्ये विविध मुद्य्यांवरून मोठा राजकीय गदारोळ पाहायला मिळाला यामध्ये प्रामुख्याने राज्यपाला भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदींनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.हा मुद्दा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून उचलून धरण्यात आला असून भाजपा आणि मुख्यमंत्री शिंदेवर जोरदार टीका सुरू आहे. याशिवाय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तत्काळ हटवले जावे अशीही जोरदार मागणी सुरू आहे.या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारपरिषदेत घेत भूमिका मांडली यावेळी त्यांनी राज्यपाल कोश्यारींवर निशाणा साधल्याचे दिसून आले.